--------------------------------- ======================================

मुसाळ:

मुसाळ:

विनायक कदम:९६६५६५६७२३

आपल्या डोळ्यात कुसाळ आणि दुसऱ्याच डोळ्यात बघायच मुसाळ ही म्हण ग्रामीण भागात फेमस हाय. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व मिक्सरच्या जमान्यात शहरी काय ग्रामीण भागातल्या बायकाबी मुसाळ इसरल्या. पूर्वी घरातील बायका मुसळान खपल्या उखळात कांडूण त्यातन घव काढायच्या.राळ ,तांदूळ हिबी कांडायच्या. तर तरच्या उन्हाळी चटण्या बायका करायच्या. लग्नात पावण्यासनी पोळ्याच जेवण आसायचं. त्यात गव्हाची कणीक चेचाय मुसळाचा दांडगा वापर व्हायचा.

उन्हाळ्यात बायका दुपारच्या येळला चटण्या, पापाड, कुरवडया,भातुडया आसलं घरातच करायच्या. येगदम वरीसभराच धान्य येगदाच वाळवायचं, निवडायचं, भरून ठेवायचं ही काम ग चार चौघीजणी एका ठिकाणी बसून हासत-खेळत, गप्पा मारत करायच्या.

तर दुस-या दिवशीच्या सयपाकाची तयारी करायच्या. उकाळ, धान्य कांडण्यासाठी वापरल जायाचं. गव्हाच्या खिरीच घव यात कांडायच. चटन्यासाठी दगडी उकळात सार कुटत आसत. त्यात कुटल्याल्या चटणीची चव व मिक्सरमधल्या चटणीची चव यीगळी हाय. उकळातली चटणी चविला चांगली आसत्या. उखळाचबी लय प्रकार हात. जमिनीत पुरल्याल उकाळ, आणि येक जमिनीच्या वर उभ उकाळ आसतय. तेला उकळी म्हणत्यात. जमिनीत पुरल्याल उकाळ तांदूळ कांडायसाठी वापरल जायाचं. पूर्वी एकत्र कुटुंबामुळे घरात जी काय करायच ती बक्कळ करायला लागायचं. त्यामुळ उकाळ, मुसाळ पण मोठं आसायचं.

भोंगिरडयाच्या लाकड़ापासन आकर्षक आणि नक्षीदार मुसाळ सुतार तयार करायचा. नक्षीदार व सुबक रितीने त्यावर कोरिव काम केल जायाचं. मुसळाच्या तळाच्या ठिकाणी लोखंडी गोल पट्टी लाकूड चिरु नये म्हणून मारली जायाची. मात्र आता कांडण प्रकार राहीला नाही मिकसरच्या जमान्यात दोन मिनिटात सारं कायपण बारीक हुतय. त्यामुळे शहरी काय ग्रामीण भागात बायकासनी बी मुसाळ इसरल्या व अडळीत पडूण तेला आता कीड लागल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *