जगातल्या पर्यटकांना भुरळ घालतोय महाराष्ट्राचा ‘भोगवे बीच’
जगातल्या पर्यटकांना भुरळ घालतोय महाराष्ट्राचा ‘भोगवे बीच’
विनायक कदम:९६६५६५६७२३
कोकण म्हणजे पृथ्वीतलावरचा ‘स्वर्गच. निसर्गानं तिथं मुक्तहस्तान उधळण केलीय. प्रत्येकान बघता क्षणी त्याच्या प्रेमात पडाव. या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा नावातच दुर्ग असल्यानं विविध किल्ले इथं बघायला मिळतात. आंबा, नारळ, सुपारी, काजूच्या बागा व फणसागत बाहेरून काटेरी तर आतून गोड गरयांप्रमाणे असणारा इथला प्रेमळ माणूस. कोकण सुडून कुठं सहजासहजी मिळणार नाही. जिल्ह्याला खूप मोठी समुद्रकिनारपट्टी आसल्यानं तिथं कायम पर्यटकांची वर्दळ. दोन वर्षांपूर्वी जगातल्या सर्वात प्रतिष्ठेच्या म्हणजे ऑस्कर पुरकाराच्या बरोबरीच्या ब्लु फ्लॉग मानांकनासाठी देशातून ८ व महाराष्ट्रातून फक्त एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे या बीच ची निवड करण्यात आली. आणि लाखो लोकांच्या नजरा भोगवेकड लागल्या. कसा असेल भोगवे.?

वेंगुर्ले तालुक्यातून भोगवे ३० ते ४० किलोमीटर आहे. जाताना रस्त्याच्या दुतर्फा आंबा, नारळ, सुपारी, काजूच्या बागांची घनदाट झाडी. अरुंद रस्त, तीव्र उतार तर कधी उभी चढण. प्रत्येक ५० फुटावर वाकडी वळण गाडीच्या चालकाची परीक्षा घेणारी. काय ठिकाणी तर आपण कुठल्या गावात जातोय का ? रस्ता चुकून जंगलात जातोय आस वाटतंय. पण प्रवास करताना कौतुक कराव वाटत सिंधुदुर्गच्या बांधकाम विभागाच आणि लालपरीच. कारण काय ठिकाणी रस्ता इतक्या अवघड ठिकाणी केलाय की कसा केला आसावा प्रश्न पडतो. गाव तिथं रस्ता,व रस्ता तिथं एसटी. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवते. आर्ध्या किलोमीटर वर लहान लहान गाव, ज्या रस्त्यावर लहान वाहन सरळ जाणार नाहीत आशा ठिकाणी एसटी जाती. प्रवाशांची काळजी घेत तीही…वेळेत.!

गावच्या शिवेवरूनच नारळाच्या बागांमध्ये वसलेलं शे पाचशे लोकसंख्येच भोगवे गाव नजरेस पडल. समुद्रकिनारयावर जाण्याआधी ग्रामपंचायतीने माहिती देणारे फलक दिसलं. कपडे बदलायला चेंजिंग रुम, पिण्याचं पाणी, स्वच्छता ते सुरक्षा व कुठल्या दिवशी किनारा साफ सफाई करायचा व केलेल्या विविध कामांची माहिती. बीचवर पाऊल टाकताच भोगवेचीच निवड किती योग्य आहे हे लक्षात येत. कचरा करण्यात व नियम न पाळण्यात आम्ही भारतीय चांगलेच माहीर. इतर किनाऱ्यावर कचरा, दारूच्या, पाण्याच्या बाटल्या, शिळ कुजके खाद्य पदार्थ, मेलेली जनावर, मासेमारीमुळ घाण झालेलं पाणी, तुटक्या नौका, जाळ्या, अस्थीविसर्जन व जवळपास लोकवस्ती मोठी असेल तर तिची घाण समुद्रात.

अथांग समुद्र, निळेशार पाणी, दूरवर पसरलेली स्वच्छ वाळू, बाजूला असणारी नारळीची वाकलेली झाड भोगवेच्या समुद्राला नमन करत होती. रो रो वाऱ्याच्या वेगानं येणाऱ्या लाटा जांभा खडक अखंडपणे आपल्या अंगावर घेत होता. पाणी स्वच्छ तर कचरा टाकायला गावानं बाजूला कचराकुंड्या ठेवल्या होत्या. बसायला खुर्च्या ठेवल्या होत्या. अशा या सर्वांगसुंदर निसर्गसंपन्न ठिकाणावर निवतीचा किल्ला शेकडो वर्षे जागता पहारा देत होता. कोचर गावच्या हद्दीत छत्रपती शिवरायांनी टेकडीवर बांधलेला हा ऐतिहासिक किल्ला आज दुर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजतोय. निवतीच्या किल्ल्यावरुन भोगवेची मनमोहक, रम्य चौपाटी दिसते. निवतीच्या समुद्रात ‘डॉल्फिन’ माशाच्या झुंडी बघता येतात. डॉल्फिनचे नृत्य पाहाण्याचा आनंदही अनुभवता येतो. यांत्रिकी होड्यांमधून समुद्र सफर करत ‘ डॉल्फिन’ चे नृत्य पाहाता येते. शांतता असल्याने या ठिकाणी वेळ कसा जातो हे कळत नाही.

ब्लू फॉग मानांकनासाठी जगातील सर्व समुद्र किनारे बघितले जातात. मानांकन देताना पाण्याचा दर्जा, किनाऱ्याची स्वच्छता आणि पर्यटकांची सुरक्षितता हे मुद्दे लक्षात घेतले जातात. भारतातून आठ तर महाराष्ट्रातून फक्त भोगवेची निवड करण्यात आलीय. महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे. हे मानांकन मिळणार अशी खात्री गावकऱ्यांना आहे. भारताला नाके मुरडून परदेशातील किनारे आम्हाला आवडतात. पण जगान दखल घ्यावी असा किनारा आपल्या महाराष्ट्रातही आहे. हे ब्लु फॉग नंतर माध्यमांनी सांगितल्यावर समजलं. भोगावे समुद्र जवळ बीच रिसॉर्ट्स व राहायला हॉटेल्स आहेत. वेंगुर्ले व कुडाळ बसस्थानकातुन थेट बीच पर्यंत बस आहे. अशा या भोगवेस तुम्हीही एकदा भेट दयाच. पण हो..भोगवेला सौंदर्याला कुठलीही बाधा येणार नाही याची काळजी घेऊन…!
फोटो सौजन्य:गुगल