व्हय… मी काय म्हंतु. !
गावाकडच अस्सल गावपण, तेंच समृद्ध जगणं, इथल्या लोकांची आभाळायेवडया कर्तृत्वाची म्हायती आता, नव्या पिढीला कूट हाय. म्हणूनच गर्दीतल्या आवाजात मागं पडल्याल, लपल्याल, मुकं झाल्याल आवाज मी हुडकतोय. त्यासनी गर्दीच्या समोर आणावं म्हणतोय.
आता बघा… गावाकडं दोन मजली बंगल झाल्यात पण छपरातला गारवा,उबारा त्यात नाय. नात्याची वीण उसवल्या, जेवायची पंगत आता बसत नाय, यंत्रयुगात गावाकडं बी रान नांगराय ट्रॅकटर आलाय. पण बैलाच्या नांगराव बसायची मजा कूट हाय. गावात बी गॅस आलाय पण चुलीची चव कुटाय, गावात बसायला शिमेटची बाकडी आल्यात पण पारावल्या गप्पाच सुख कूट हाय. मोटारसायकल न जत्रला आता जातूय, पण बैल गाडीतन जायाच सुख काय येगळच…!! कुस्त्या काय..? तमाशा काय..? बैलांच्या शर्यती..?हुई…. गावातली लग्न बी मंगल कार्यालयात व्हाय लागली आणि या साऱ्या गोतावळ्यात मायेचा गोडवा कमी झालाय.
रानातली पाखर राखायची, हिरीत पवायच,म्हसर राकायचं, आंब, चिंचा पाडायच्या, चिनी दांडू, सुरफाट्या, लपाछपी,आयरं कुया… असलं खेळ राहिल्यात कूट..? असल्या हरवलेल्या समृद्ध गावांच गावपण ‘गर्दीतल्या आवाज’ मध्ये दयायच… तेपण आपल्याच मोकळ्या ढाकळ्या भाषेत मनापासन प्रयत्न करतोय.गोड मानून घ्या; माय बाप हो ।
‘गर्दीतला आवाज’मंदी फापड पसारा आसणार नाय, लोकासनी भारी वाटलं, गॉड वाटलं आसल लिखाण तर आजिबात येणार नाय, ही नुसतं शब्द न्हायती तर गावाकडल्या मातीतल्या व वास्तवातल्या भावना ह्यात असणारायत, नुसत्या कल्पना नसणारायत.मातीतल अस्सल लिहायचा प्रयत्न करतोय.
….”प्रथम मायभुच्या चरणा…
🙏🌹🙏
विनायक सुभाष कदम
तर….
गावाकडची माती,नाती – गोती.
अस्सल माणसं, माणसांची नीती.
प्रथा – परंपरा, चाली -रिती.
गावचे उरूस – जत्रा, भरल्या यात्रा.
ऋतू -खेळ, सणवारांचा मेळ.
ग्रामीण लोककला…’औलादिं’च्या नानाकळा.
त्यांचं बोलणं – चालणं – वागणं.
ताठ-रुबाबात…तर क्षणात कधी ‘रांगण…!
इतिहास, भूगोल, अजब रसायन’ शास्त्र..
मन-मेंदू असो नसो; गजब मानसशास्त्र.
…..अशा अनेक गोष्टी, घटना,व्यक्तींची दखल ह्या स्पर्धेच्या युगात फारसं कोणी घेताना दिसत नाही.
गावाकडील असंख्य कर्तबगार हरहुन्नरी माणसं ‘अशीच’ मातीत मिसळून गेली. त्यांच कर्तृत्व अभाळाएव्हढं मोठं होतं, आहे. आणि ते सर्वदूर पसरलेलं सुद्धा आहे. पण शब्दांत त्यांना कुणी पेरलं नव्हतं; नव्यानं उगवण्यासाठी..!
21व्या शतकाच्या कारखानदारीत यंत्र झालेल्या माणसांच्या तोबा गर्दीत…
गावरंग’ची नेमकी परिभाषा…
💝’गर्दीतला आवाज’💝
शोधतो आहे. आपल्यासारख्या ‘भविष्याची चिंता वाहणाऱ्या वर्तमानात; थोडा गौरवशाली इतिहास-काळवंडून गेलेला भूतकाळ’ मांडतो आहे. स्वतः माणूस म्हणून जगतो आहे; जिवंत होतो आहे…
“गर्दीतला आवाज” बनून ।।
जरासं ईस्कटून
आतापातूर निस्वार्थ भावनेनं
ग्रामीण भागातील तळागाळातील दबलेल्या – पिचलेल्या ऐंशीहून अधिक व्यक्तींविषयी लेखन.
‘व्यक्तिविशेष’लिखाणाला विविध दैनिकं,साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंक, नामवंत ब्लॉग्स, सोशल मिडिया यातून प्रसिद्धी.
नुसतं लेखन नाही…!
त्या संबंधित उपेक्षित व्यक्तींना भरघोस मदत मिळवून दिलीच पण; समाजासमोर आणून मानसन्मान मिळवून दिला. त्यांना नव्याने उभारी दिली.
……आणि,
विविध पर्यटन स्थळं, दुर्लक्षित ऐतिहासिक ठिकाणं यांच्यावर लिखाण करून जगासमोर आणली. त्यांचा गौरवशाली इतिहास जतन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला.
….शिवाय, शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया,भटके विमुक्त-पारधी, पशु-पक्षी, प्राणी, दिन-दुबळ्या माणसांना आधार दिला.
पर्यावरण जनजागृती, संवर्धन, निसर्ग बचावासाठी अविरतपणे प्रयत्न सुरूच आहेत.
महत्त्वाचे म्हणजे …
दरवर्षी विविध प्रकारची तीनशे पेक्षा अधिक देशी फुलां-फळांची झाडं स्वतः तयार करून त्यांचं संगोपन करणाऱ्यांना अगदी मोफत वाटप.
‘माणसांना माणसात आणणे, गावात आणणे,निसर्गात आणणे..’ हा एकमेव ध्येय आणि ध्यास घेऊन जगणारा अवलिया…
अर्थात;
गावरंग’ची नेमकी परिभाषा…
💝’गर्दीतला आवाज’कार💝
विनायक सुभाष कदम
About Garditalaawaj In English In Short
The village is the real village, the prosperous life, the glory of the achievements of the people here, kudos to the new generation. That’s why, if the voice falls behind, hides, becomes mute in the crowd, I shout. He wants to bring it in front of the crowd.
Ranatli Pakhar rakhai, Hirit Pawaich, Mahsar rakachi, Mango, Tamarind pada, Chini Dandu, Surfatya, Lapachpi, Iron kuya… If there are any games left, how can you cheat..? Even the villages of such lost prosperous villages must be given to the ‘voice in the crowd’… they are also trying with their hearts in their own free language. Accept it sweetly; Be my father.